बांधकाम कामगारांच्या इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना प्रतिवर्षी 2,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
आर्थिक दृष्ट्या गरीब कामगारांना आपल्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे काही वेळेला कामगारांच्या मुलांना शिक्षण सोडावे लागते ज्यामुळे त्यांचा सामाजिक विकास होत नाही. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत कामगार कल्याण योजना शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
या योजनेचे काही उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत:
- आर्थिक मदत: या योजनेमुळे कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणे, विशेषतः जेव्हा कुटुंबातील कमावता व्यक्ती मृत्यू पावते किंवा अपंग होते.
- शिक्षणाची सुविधा: या मदतीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणे, ज्यामुळे त्यांना चांगल्या भविष्यासाठी तयार होण्यास मदत होईल.
- जीवनमानात सुधारणा: या योजनेमुळे कामगार कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे.
कामगार कल्याण योजना शिष्यवृत्ती चे वैशिष्ट्य
- योजनेअंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्ती रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना चे लाभार्थी
- इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असलेले कामगारांचे पाल्य
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अंतर्गत आवश्यक पात्रता व अटी
- विद्यार्थ्यांना किमान 75% अथवा अधिक उपस्थिती आवश्यक
- 75% टक्के हजेरी बाबत अर्जासोबत शाळेचा दाखला देणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी सरकारी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीत अर्जासोबत त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- कामगारांचे पाल्य इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेचे बोनाफाईट प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
कामगार कल्याण योजना शिष्यवृत्ती अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- 75% टक्के हजेरी बाबत शाळेचा दाखला
- शिक्षण प्रमाण पत्र
- कामगारांचे आधार कार्ड
- कामगाराचा मृत्यू झाला असल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र
- कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला जन्म प्रमाणपत्र
- कामगारांचे आधार कार्ड
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |