नोंदीत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
बहुतांश कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांना मिळणारे वेतन हे कमी असते त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज तसेच मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे कामगारांची मुले स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे कामगारांचा तसेच त्यांच्या मुलांचा या सर्व समस्यांचा विचार करून बांधकाम कामगार आर्थिक विकास महामंडळाने सदर योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
योजनेचे उद्दिष्ट
- या योजनेचा मुख्य उद्देश नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे.
योजनेचे लाभार्थी
- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुले
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत कामगारांच्या लाभार्थी मुलांना प्रति शैक्षणिक वर्षासाठी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
महत्वाची तारीख:
- दरवर्षी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरण्यास सुरुवात केली जाते.
- पूर्ण भरलेले अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातात.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी
- कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांच्या पाल्यांना किंवा पत्नीस अर्ज करणे आवश्यक आहे.
- कामगार हा मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- अर्जदार पाल्यांनी शासनमान्य पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
- पाल्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये.
- अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- विद्यार्थ्याने किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
- चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती/बोनाफाईड
- कामगाराचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- अर्जदार पाल्याचे आधार कार्ड
- अर्जदार पाल्याच्या बँक खात्याचा तपशील
- कामगाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Maharashtra Bandhkam Kamgar Yojana]
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |