राज्यातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदित आस्थापनेमधील कामगारांच्या पाल्यांसाठी वाहन चालकाचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यास आलेले आहेत. कामगार कुटुंबिय पाल्यांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सदरचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत.
वाहन चालक प्रशिक्षण योजना चे उद्दिष्ट:
- राज्यातील कामगार व कामगाराच्या पाल्यांना वाहन चालक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
- वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण करून पाल्यांना वाहन चालक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
प्रशिक्षण कालावधी:
- वाहन चालकाचे प्रशिक्षण हे 21 दिवसाचे रोज 1 तास असेल.
योजनेचे नियम व अटी:
- प्रशिक्षणार्थीचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.
- वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा.
- सदरच्या प्रशिक्षणामध्ये कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाची अट इयत्ता ८ वी ते पदवी अशी राहील.
- अर्जदारास कोणत्याही प्रकारे अंपगत्व नसावे. तसेच कोणताही दृष्टीदोष व कर्णदोष नसावा यासाठी अर्जदाराने प्रवेश अर्जात उल्लेख करावा.
- प्रशिक्षणार्थी हा शारिरीक दृष्टया सक्षम असावा.
- कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा कामगार पाल्यांसाठी 3 लाख रुपये व कामगारांसाठी 2.5 लाखापर्यंत असावे.
- अर्जासोबत कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांचा दाखला जोडावा.
- सदर प्रशिक्षणाचा एका कुंटूबातील एकाच सभासदास लाभ देण्यात येईल.
- मंडळाच्या या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीकडून सरसकट 500/- एवढे माफक शुल्क आकारण्यात येईल.
- प्रशिक्षणार्थीना कामगार कल्याण केंद्राचे सर्वसाधारण सभासद नोंदविण्यात यावे.
- प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीला शिकाऊ वाहन चालक परवाना मिळेल. त्यानंतर त्यांना स्व खर्चाने कायम वाहन चालक परवाना प्राप्त करावा लागेल.
- प्रवेश नोंदणी करताना प्रशिक्षणार्थीकडून प्रवेश अर्ज भरुन घेण्यात येईल.
- प्रशिक्षण वर्गासाठी एका बॅचमध्ये 5 प्रशिक्षणार्थीना प्रवेश देण्यात यावा.
- प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण.मंडळ व मारुती सुझुकी यांचे संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र दिले जाईल.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे कागदपत्रे:
- अर्जासोबत 2 पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र)
- वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला,
- रहिवाशी पुराव्यासाठी रेशन कार्ड / लाईट बील / सक्षम अधिकाऱ्याचा रहिवासी दाखला,
- पालकांची चालू वर्षाची माहे जुन / डिसेंबर कामगार कल्याण निधी कपात उल्लेख असलेली वेतन पावती सोबत जोडावी.
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला जोडावा.
अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार कामगार किंवा त्याच्या पाल्यांना आपल्या क्षेत्रातील कामगार कल्याण मंडळात जाऊन किंवा आम्ही खाली दिलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कामगार कल्याण मंडळात जमा करावा लागेल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |