Rajya Kamgar Vima Yojana Maharashtra: या योजनेअंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजार झाल्यास त्याच्या वैद्यकीय उपचाराकरीता आर्थिक सहाय्यता देण्याची मंडळाची योजना आहे.
महत्वाचा बदल: एका व्यक्तीस एका गंभीर आजारा करीता एकदा लाभ दिल्यानंतर पुन्हा दुसरा गंभीर आजार झाल्यास त्यांना दुसऱ्यांदा लाभ देण्यास मान्यता व मंजूरी देण्यात येईल.
योजनेचे उद्दिष्ट:
- राज्यातील कामगारांना त्यांच्या असाध्य रोगावर उपचार करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना आर्थिक मदत पुरवणे.
- गंभीर आजारांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ घेता येतो.
- कमीत कमी 5,000/- रुपये ते जास्तीत जास्त 25,000/- रुपये पर्यंत आर्थीक लाभ दिला जातो.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते.

खालील आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी आर्थीक लाभ दिला जातो:
- ब्रेन ट्युमर
- ह्रदय शस्त्रक्रीया
- क्षय रोग
- एड्स
- मुत्रपिंड प्रत्यारोपण
- कर्करोग
- कोमा
- गँगरीन
- गंभीर स्वरुपाचे पॅरालिसीस
- गंभीर स्वरुपाचे सिकलसेल
- इतर गंभीर स्वरुपाचे आजार ज्यास मंडळाने चिकित्सकांच्या सल्याने गंभीर आजार म्हणून मान्यता दिलेली असावी.
आर्थीक सहाय्यता रकमेचा तपशील:
5,000/- रुपये ते 25,000/- रुपये पर्यंत आर्थिक मदत (उपचारांवर केलेल्या खर्चानुसार)
रुग्णाचा झालेला खर्च | आर्थिक सहाय्य |
10,000/- रुपये ते 25,000/- रुपये पर्यंत | 5,000/- रुपये |
25,001/- रुपये ते 50,000/- रुपये पर्यंत | 10,000/- रुपये |
50,001/- रुपये ते 75,000/- रुपये पर्यंत | 15,000/- रुपये |
75,001/- रुपये ते 1 लाखा पर्यंत | 20,000/- रुपये |
1 लाखापेक्षा जास्त | 25,000/- रुपये |
योजनेच्या अटी व शर्ती:
- अर्जदाराने मंडळाच्या जवळच्या कामगार कल्याण केंद्रामध्ये विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- संबंधित केंद्र प्रमुखांनी सदर अर्जदारास केंद्राचे सर्वसाधारण सभासद म्हणून नोंदणी करावी.
- अर्जदाराने सर्व शासकीय, महानगरपालिका/ नगरपालिका, सार्वजनिक, शासनमान्य, धर्मादाय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेला असावा किंवा उपचार सुरु असावा.
- सदर रुग्णालयात घेतलेल्या उपचारांचे / शस्त्रक्रीयेचे कागदपत्र तसेच आजारावर वैद्यकीय उपचाराकरीता झालेल्या खर्चाच्या पावत्या सत्य प्रती सोबत जोडाव्या. पावत्या 1 वर्षाच्या आतील असाव्यात.
- सदर अर्जदारावर उपचार सुरु असल्यास रुग्णाच्या वैद्यकीय उपचाराचा येणारा खर्चाचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला सोबत जोडावा.
- माहे जून किंवा डिसेंबर ची वेतन पावती सोबत जोडावी ज्यामध्ये कामगार कल्याण निधी केल्याचा उल्लेख असावा. ( अर्जदार कामगार असल्यास स्वतःची किंवा पालकाची).
- अर्जासोबत अर्जदार / पालक ज्या आस्थापनेत काम करीत आहे त्या आस्थापनेचा कामगार कल्याण निधी भरणा केल्याचा आणि त्यामध्ये जून किंवा डिसेंबर चा निधी मंडळाकडे भरणा केल्याचा धनादेश क्र. व दिनांक मंडळाकडील आस्थापना नोंदणी क्रमांक नमुद करावा.
- अर्ज मंजुर झाल्यानंतर अर्जदारास रेखांकीत धनादेशाद्वारे रक्कम देण्यात येईल.
- रुग्णावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु असल्यास आर्थीक सहाय्याची रक्कम रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे अदा करण्यात येईल.
- या योजने अंतर्गत मंडळाकडे अर्ज सादर केल्यानंतर अर्ज विचाराधिन असताना रोगी मृत पावल्यास कामगारास अथवा कामगारांच्या वारसाला वरील नियम आणि अटींची पूर्तता करीत असल्यास आर्थीस सहाय्याची रक्कम अदा करण्यात येईल.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- माहे जून/ डिसेंबरच्य पगाराची स्लीप (सांक्षकीत झेरॉक्स प्रत व M.L.W. Fund कपातीची नोंद आवश्यक)
- रेशन कार्डची झेरॉक्स (दोन्ही बाजीची) सत्यप्रत.
- ज्या रुग्णालयात औषधोपचार / शस्त्रक्रीया केली असेल / करणार असेल त्या रुग्णालयाचे रोग निदान प्रमाणपत्र, दवाखाज्यतुन सुट्टी ( डिस्चार्ज) दिल्याचे प्रमाणपत्र, औषधे खरेदी केलेल्या पावत्यांची झेरॉक्स प्रत, रुग्णालयाची रोख रक्कम भरणा केल्याची पावती, रोगसंबंधी सहाय्यभूत ठरणारे इतर कागदपत्रे.
- औषधोपचार केल्याचा / करणाऱ्या खर्चाचा तपशिलाचा तक्ता.
योजनेअंतर्गत कार्यपद्धती:
या योजने अंतर्गत केंद्र प्रमुखांनी अर्जाची तपासणी करुन अर्ज स्विकारल्या नंतर दहा दिवसांत सदरचे अर्ज गट कार्यालयास सादर करावे. गट प्रमुखानी अर्जाची तपासणी करून त्यांना प्राप्त झालेल्या तारखेपासून दहा दिवसात विभागीय कार्यालयाकडे सादर करावे. विभाग प्रमुखांनी या योजनेच्या नियम व अटी नुसार विभाग स्तरावर 8 दिवसाच्या आत निर्णय द्यावा. जे अर्ज मंजूर होतील, त्याप्रमाणे मंजूर रकमेचा धनादेशाचे वाटप 15 दिवसाच्या आत लाभार्थीना करण्यात यावे. ही योजना राबविताना प्रत्येक स्तरावरील कालमर्यादा पाळणे बंधनकारक राहील.
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
आम्ही खाली साहित्य प्रकाशन अनुदान योजना चा अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जमा करावा.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.

- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप:
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी आहे.
- योजना आणि नियमांमध्ये बदल होत असू शकतात. त्यामुळे, अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53[at]gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
योजनेचा अर्ज | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |