बांधकाम कामगार कामानिमित्त सतत स्थलांतरीत होत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यांनतर प्रत्यक्ष काम मिळेपर्यंत सदर बांधकाम कामगारांना राहणे, शौचालय, पाळणाघर इत्यादी अभावी मुलभूत सोयी सुविधेकरीता त्रास सहन करावा लागतो. बांधकाम कामगारांना लेबर कम नाईट शेल्टर, मोबाईल टॉयलेट, मोबाईल फ्रेंच अशा सोयी सुविधा मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.
बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. तसेच ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात त्यामुळे अनेकदा ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात आणि सतत च्या स्थलांतरणामुळे त्यांना राहण्याची आणि मूलभूत सुविधांची कमतरता निर्माण होते. कामगारांच्या या समस्येवर उपाय म्हणून, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना राहण्यासाठी ट्रांझिट कॅम्प ची सुविधा उपलब्ध करून देते.
कामगारांना ट्रांझिट कॅम्प अंतर्गत दिल्या जाणारी सुविधा
- पुरुष आणि महिलांना राहण्यासाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था दिली जाते.
- ट्रांझिट कॅम्प मधील खोल्या ह्या स्वच्छ आणि हवेशीर असतील व हवा खेळती राहील याची दक्षता घेतली जाईल.
- कामगारांना झोपायला पलंग तसेच उशी, गादी व पांघरण्यासाठी चादरी ची सुविधा दिली जाते.
- स्वच्छ स्नानगृहांची व्यवस्था दिली जाते.
- पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा
- विजेची सुविधा दिली जाते.
- रूम मध्ये स्वयंपाकघर ची सुविधा दिली जाते.
- टँझिट कॅम्प मध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा दिली जाते.
- कामगारांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था
- कामगारांना मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्था केली जाते.
योजनेचे उद्दिष्ट
- बांधकाम कामगारांना तात्पुरता सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे.
- कामगारांचे व त्याच्या कुटुंबाचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण करणे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगार हा बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेले कामगार.
महत्वाच्या बाबी
- शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेवर सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
- सदर सुविधा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असेल.
- सदर सुविधा प्रथम महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात देण्यात येतील.
- सदर सुविधांचा वापर फक्त बांधकाम कामागरांकरीताच करण्यात येईल.
- सदर सुविधेचा वापर शुल्क आकारून / निशुल्क पध्दतीने करताना त्याबाबतची नोंद रजिस्टरमध्ये ठेवण्यात येईल.
- ट्रांझिट अकोमडेशन, लेबर कम नाईट शेल्टर करीता उभारण्यात आलेले इमारतीमध्ये सर्व सोयी सुविधांचा समावेश असेल.
- मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ वाटपाकरीता होणाऱ्या वार्षिक खर्चाच्या तुलनेत 10% पेक्षा जास्त खर्च अशा सुविधांवर करण्यात येणार नाही.
- ज्या बांधकाम साईटवर 100 ते 250 पर्यंत बांधकाम कामगार काम करतात अशा ठिकाणी ट्रांझिट कॅम्पची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
- सदर योजना महानगरपालिका / नगरपालिका क्षेत्रात राबविण्यापूर्वी सदर क्षेत्रात चालू असलेल्या बांधकाम साईटचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी नियुक्त संस्थेची राहील.
- सदर सुविधेकरीता शासन / महानगरपालिका / नगरपालिका / कंत्राटदार यांचेमार्फत जागा उपलब्ध करून देतील. परिसरातील बांधकाम साईटचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर ट्रांझिट कॅम्प स्थलांतरीता करण्यात येतील व ट्रांझिट कॅम्प करीता वापरण्यात आलेली जागा संबंधित संस्थांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी नियुक्त संस्थेची राहील.
- ट्रांझिट कॅम्पची स्थापनेमुळे बांधकामाच्या साईटवर अथवा परिसरातील नागरी सुविधांवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे नियुक्त संस्थेवर बंधनकारक राहील.
- ट्रांझिट कॅम्पमध्ये निवास, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह या मूलभूत सुविधांचा समावेश राहील.
- उपरोक्त संस्थांकडून जागा उपलब्ध न झाल्यास ठराविक कालावधीसाठी जागा भाडयाने घेण्यात येईल. सदर जागेचे भाडे मंडळाकडून नियुक्त संस्थांना अदा करण्यात येईल.
- ट्रांझिट कॅम्पची देखभाल, दुरूस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा इत्यादीबाबतची जबाबदारी नियुक्त संस्थाची राहील.
- सदर ट्रांझिट कॅम्पच्या देखभाल, दुरूस्तीकरीता प्रशिक्षित व्यक्तीची नेमणूक करणे नियुक्त संस्थेस बंधनकारक राहील.
ट्रांझिट कॅम्पचे कामगारांना होणारे फायदे
- कामगारांसाठी परवडणारे निवास: ट्रांझिट कॅम्प हे कामगारांसाठी परवडणारे निवास आहे, विशेषतः जे शहरात नवीन आहेत किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही.
- सुविधांमध्ये सुधारणा: ट्रांझिट कॅम्प अंतर्गत स्वच्छ पाणी, वीजपुरवठा आणि स्वच्छता सुविधांसारख्या मूलभूत सुविधा मिळते.
- सुरक्षा: ट्रांझिट कॅम्प ची सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे देखरेख केली जाते आणि ते कामगारांना धोक्यांपासून संरक्षण प्रदान करते.
- सामुदायिक भावना: ट्रांझिट कॅम्प कामगारांना एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
- स्वस्त निवास: ट्रांझिट कॅम्प हे खाजगी राहण्याच्या पर्यायांपेक्षा स्वस्त असते.
- जेवण: अनेक ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये कामगारांना स्वस्त दरात जेवणाची सुविधा उपलब्ध असते.
- कामगारांना राहण्याची आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता मिळेल.
- कामगारांचे होणारे स्थलांतर थांबेल.
- कामगारांना कामाच्या ठिकाणी राहायला ट्रांझिट कॅम्प ची सुविधा सुरु केल्यामुळे त्यांना प्रवासाची चिंता करण्याची गरज भासणार नाही व त्यामुले त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल.
योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |