महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 च्या कक्षेत येणाऱ्या सर्व आस्थापना (उदा. कारखाने, दुकाने व आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल्स, रेस्टोरेंट, बँका, हॉस्पिटल, मंडळे, महामंडळे, इ.) यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 मधील कलम 6बब (2) मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्र.25 दि. 18/03/2024 अन्वये सुधारणा झालेली आहे. त्यामुळे कामगार आणि मालक अंशदान दरात जून 2024 पासून पुढीलप्रमाणे सुधारणा झाली आहे.

सहामाही अंशदान दर:
कामगारांचे अंशदान प्रती कामगार | मालकांचे अंशदान प्रती कामगार | एकूण |
२५/- रुपये | ७५/- रुपये | १००/- रुपये |
उपरोक्त सुधारणेनुसार जून 2024 पासून कामगार आणि मालक अंशदान public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधेद्वारे अदा करणे बंधनकारक आहे याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |